एकीकडे जगात युद्ध पेटलेले, दुसरीकडे चीनचा सोनेखरेदीचा सपाटा, सोन्याचे भाव किती वाढणार ?
अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष पेटला असताना, चीन शांतपणे सोने खरेदी करत आहे. सलग १६ महिने चीन आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करत आहे. या जागतिक अस्थिरतेमुळे भांबावलेले गुंतवणूकदार आता सोन्याला सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानत आहेत.