पुण्यात आज दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीसांनी पुलाला दादांचे नाव देण्याच्या मागणीला सहमती दर्शवली. प्रकल्पांचे नियोजन कमी वेळेत पूर्ण करण्यावर भर देत, पीएमआरडीए पुणे व परिसराच्या भविष्यातील शहरीकरणासाठी महत्त्वाचे ठरेल असे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित होते.