IND vs NZ T20 WC Final : आज 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांना शांत बसवायचय, न्यूझीलंड कॅप्टनच्या जिव्हारी लागणाऱ्या स्टेटमेंटवर सूर्याचं एकदम कडक उत्तर

IND vs NZ T20 WC Final : टीम इंडिया आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध टी20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळणार आहे. या मॅचआधी न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनरने भारतीयांच्या जिव्हारी लागेल असं स्टेटमेंट केलय. त्याला कॅप्टन सूर्यकुमार यादवने तसचं उत्तर दिलय.