संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर

बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला एका दिवसासाठी कारागृहातून बाहेर पडण्याची परवानगी मिळाली आहे. भावाच्या बाराव्या विधीसाठी गावी जाण्यासाठी न्यायालयाने ही मर्यादित परवानगी मंजूर केली आहे. ही तात्पुरती सुटका केवळ एका दिवसापुरती वैध असून, विधी पूर्ण होताच त्याला पुन्हा कारागृहात हजर व्हावे लागेल.