सामाजिक विषयावर विनोदी अंगाने भाष्य करताना विषयातील गांभीर्य कायम राखण्याचं काम 'लाडकी बहीण' चित्रपटात करण्यात आलं आहे. मराठीतील नामवंत कलाकारांचा अभिनय रसिकांना अखेरपर्यत खिळवून ठेवणारा ठरणार असून, लावणी क्वीन गौतमी पाटीलची गवळण रसिकांवर मोहिनी घालणार आहे. चिनू चेतन यांनी या चित्रपटातील गीतांची कोरिओग्राफी केली असून, संगीत विनीत देशपांडे यांनी दिलं आहे.