आमदार आणि खासदारांनंतर आता पंचायत समित्यांवरही शिंदेंचा कब्जा, कोणत्या तालुक्यात कोणाची वर्णी लागली?

रत्नागिरी जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ८ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. चिपळूणमध्ये अजित पवार गटाला संधी मिळाली असून, पाच तालुक्यांत महिलांना सभापती पद देऊन शिवसेनेने महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला आहे.