राहुरीच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजलं, कर्डिलेंचा वारसदार की नवा चेहरा? कोणाचं नाव आघाडीवर?
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. २३ एप्रिल रोजी मतदान आणि ४ मे रोजी निकाल लागणार असून अक्षय कर्डिले, संग्राम जगताप आणि प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.