Supriya Sule : गॅस तुटवडा असल्याचं सरकार का कबूल करत नाही ? सुप्रिया सुळेंचा रोखठोक सवाल

आखाती देशांतील युद्धाचे पडसाद भारतातही उमटत आहेत, ज्यामुळे एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा जाणवत आहे. घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी गॅस मिळत नसल्याने लोक त्रस्त आहेत, अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. सरकार मात्र टंचाई नाकारत आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, वस्तुस्थिती स्वीकारून यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे, जेणेकरून जनतेला दिलासा मिळेल.