सध्या सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राऊत यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला. डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की, “मला इराणवर बॉम्ब टाकायला मजा येते.” माणसं मारण्यात ज्याला मजा येते, अशा व्यक्तीच्या राष्ट्राशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलामीचा करार केल्यासारखी भूमिका घेतली आहे.