मुंबईत गॅस आणि इंधन टंचाईची समस्या गंभीर होत चालली आहे. शहरात सुमारे 35 टक्के हॉटेल व्यवसाय बंद झाले आहेत, तर येत्या तीन-चार दिवसांत 75 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे खाद्यपदार्थांचे दर वाढत आहेत, तसेच कामगार गावाकडे परतत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या परिस्थितीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारला टोले लगावले.