Ajit Pawar | अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची माहिती

दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी राज्यसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आरजेडीचे खासदार मनोज कुमार झा यांनी या घटनेबाबत केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागितले. मनोज कुमार झा यांनी विमान वाहतूक मंत्रालयाला प्रश्न विचारताना, या अपघातानंतर विमान सुरक्षा व्यवस्थेत काही सुधारणा करण्यात येणार आहेत का? असा सवाल उपस्थित केला.