LPG Crisis : 46,000 मेट्रिक टन LPG भारतात आला, त्यातून किती गॅस सिलेंडर भरले जातील? देशात किती कोटी लोक एलपीजी ग्राहक?

देशात वर्षागणिक एलपीजीची विक्री वाढत चालली आहे. पण त्या तुलनेत देशांतर्गत उत्पादन वाढलेलं नाही. आजही भारतात एकूण गरजेच्या फक्त 40 टक्के उत्पादन केलं जातं. भारत 60 टक्के एलपीजीसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. यात कतर, यूएई हे मिडिल ईस्टमधील देश आहेत.