पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश पाळले जात नसल्याचे चित्र समोर आले आहे. मार्केट यार्ड परिसरात मोठी गर्दी झाली असून नागरिकांना रस्त्यावरच गॅस सिलेंडर वाटप केल्याचे पाहायला मिळाले. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुधी यांनी काल गॅस एजन्सींची बैठक घेऊन घरपोच गॅस वितरित करण्याचे निर्देश दिले होते. तरीही काही एजन्सी नियम मोडत रस्त्यावरच सिलेंडर वाटप करत आहेत.