युद्धात बहरली मानवता… अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराची निःस्वार्थ सेवा…

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीत, अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. इराण-इस्रायल संघर्षामुळे भयभीत झालेल्या हजारो प्रवाशांना स्वयंसेवकांनी अन्न, निवारा, मार्गदर्शन आणि मानसिक आधार दिला. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे आशा पल्लवित झाली आणि कठीण काळात मानवता, श्रद्धा व एकजुटीचे महत्त्व अधोरेखित झाले. ही सेवा भीतीवर मात करून सुरक्षित घरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवते.