विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून त्यांच्या निलंबनाची मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.