सुपरपावर अमेरिकेला नाही जमलं, आता एक छोटासा देश ज्याला झिडकारलं, तोच आज सौदी, कतर, UAE, बहरीनसाठी बनला रक्षक

इराण विरुद्ध सुरु केलेल्या युद्धात अमेरिका अनेक आघाड्यांवर अपयशी आहे. पण त्यांचं सर्वात मोठ अपयश म्हणजे आखातातील आपले मित्र देश सौदी अरेबिया, कतर, बहरीन, ओमान, UAE यांचा बचाव करता न येणं. आता एक छोटसा देश या आखाती देशांसाठी संकटमोचक बनलाय.