MNS GudhiPadava Melava 2026 : गेल्यावर्षी मराठीच्या मुद्दावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि महापालिका निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्रित लढवली. ठाकरे ब्रँडची हाक दिल्यानंतर पहिला दसरा मेळावा झाला तर आता गुढीपाडव्यानिमित्त राज गर्जना पुन्हा घुमणार आहे. आजच्या मेळाव्यातून ठाकरे कुणाचा समाचार घेतात याची चर्चा सुरू आहे.