राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक काळातील घडामोडींवर भाष्य करत मोठा आरोप केला आहे. निवडणुकीदरम्यान राज्यातील काही मोठे नेते आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या प्रयत्नात होते, असा दावा मुंडे यांनी केला. मुंडे म्हणाले की, अशा प्रतिकूल परिस्थितीतही परळीकरांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिला आणि विजयी केले.