Anjali Damania on Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांचे भोंदू खरातांसोबत 4 नवे फोटो, अंजली दमानिया आक्रमक

भोंदू बाबा अशोक खरात याला लैंगिक शोषण आणि छळाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरातून शस्त्रे, काडतुसे जप्त झाली असून, त्याचे राजकारण्यांशी, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी असलेले संबंध समोर आले आहेत. यात रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने त्या टीकेच्या धनी ठरल्या. अंजली दमानिया यांनी चाकणकरांच्या पदावरुन हकालपट्टीची मागणी केली आहे, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले आहे.