स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याला बलात्कार प्रकरणी अटक झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्या पेनड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेत्यांचे खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने विरोधकांनी सरकारला घेरले आहे. सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांच्या अटकेची मागणी करत, राजकीय संबंधांच्या चौकशीची जोरदार मागणी केली आहे.