अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तात्काळ भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे धुळे जिल्ह्यातील साक्री व शिंदखेडा तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा आणि मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातही फळबागा आणि विविध पिकांवर अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.