Pune News | पुणे पुन्हा हादरलं! क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार

पुणे जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धेच्या बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भैरवनाथ मैदान परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट स्पर्धेचा बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता.