भोंदूबाबा अशोक खरात बलात्कार प्रकरणात नाव आल्याने आणि राजकीय दबावानंतर रुपाली चाकणकर यांनी अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने टीकेची झोड उठली. रोहिणी खडसे आणि सुषमा अंधारे यांनी राजीनाम्यानंतरही चाकणकरांवर निशाणा साधला आहे, त्यांच्या राजीनाम्याला 'हकालपट्टी' म्हणत पुढील कारवाईची मागणी केली.