Ashok Kharat : अल्पवयीन मुलगी आणि केबल टेस्टर… भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर

स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरातला बलात्कार प्रकरणी अटक झाली असून त्याच्या भोंदूगिरीचे अनेक थरारक कारनामे समोर आले आहेत. महिलांचे शोषण करण्यासाठी तो 'केबल टेस्टर'सारख्या उपकरणांचा वापर करून उपचार करत असल्याचा बनाव करत असे. ५८ हून अधिक व्हिडिओ सापडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. नीरज जाधवमुळे हे काळे सत्य उघडकीस आले असून, खरातच्या अडचणी वाढल्या आहेत.