Sanjay Raut : त्या बड्या मंत्र्याचा राजीनामा घ्या; मोठ्या मागणीने खळबळ; भोंदूबाबा प्रकरणात संजय राऊत यांचा थेट शिंदे गटावरच प्रहार

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याला महिलांच्या लैंगिक शोषणाखाली अटक करण्यात आली. त्याच्या राजकीय संबंधांमुळे खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भोंदू बाबांच्या सल्ल्यानुसार मंत्रीमंडळ काम करत असल्याचा राऊतांचा गंभीर आरोप आहे.