नाशिकमधील कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला महिलांच्या लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीच्या आरोपावरून अटक झाली आहे. आता जमिनीच्या वादातून एका हत्येचाही गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला असून, यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. राजकीय संबंधांचा वापर करून त्याने जमीन हडपल्याचेही उघड झाले आहे.