उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचं बोट काढलं,  6 वर्षांच्या मुलाच्या ऑपरेशनमध्ये हलगर्जीपणा, पंढरपूर हादरलं
TV9 Marathi

उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचं बोट काढलं, 6 वर्षांच्या मुलाच्या ऑपरेशनमध्ये हलगर्जीपणा, पंढरपूर हादरलं

पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक वैद्यकीय हलगर्जीपणा समोर आला आहे. ६ वर्षीय मुलाच्या उजव्या हाताचे दुखरे बोट काढण्याऐवजी डॉक्टरांनी डाव्या हाताचे बोट काढल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉ. वर्षा काणे यांनी ही शस्त्रक्रिया केली असून, या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रुग्णालयाने चौकशी समिती नेमली असून, अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Go to News Site