TV9 Marathi
नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात महिला अत्याचार आणि फसवणुकीप्रकरणी अटकेत आहे. त्याला अनेक राजकारणी भेटत असल्याची माहिती समोर आली. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर खरातला भेटल्याचा आरोप केला आहे, जो गोऱ्हे यांनी फेटाळला. देसाईंनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आपल्या दाव्यांचा पुनरुच्चार करत, शिंदे गटातीलच कार्यकर्त्यांनी माहिती दिल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
Go to News Site