TV9 Marathi
बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसंबंधी राज्यातील राजकारण पुन्हा गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी आकस्मिक निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली. यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. यासाठी आज महायुतीकडून विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सत्ताधारी पक्षाकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, काँग्रेसने अॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्यामुळे आता महाविकास आघाडी कोणाला पाठिंबा देणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Go to News Site