TV9 Marathi
अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात 17 फोन कॉल्स झाल्याचे म्हटले होते. मात्र, या दाव्यानंतर दमानिया यांच्याकडे अशोक खरात यांचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) नेमका कसा आला, असा सवाल विविध स्तरांवरून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली.
Go to News Site