TV9 Marathi
महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाची देशभरातही मोठी चर्चा सुरू आहे. भोंदूगिरी, लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक अशा गंभीर आरोपांखाली खरात याला अटक करण्यात आली असून सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला. “खरात मुस्लिम असता तर सगळ्या मुसलमानांची वरात काढली असती. जात-धर्म न पाहता नालायक माणसाला नालायक म्हणण्याची हिम्मत असली पाहिजे,” असे ते म्हणाले.
Go to News Site