TV9 Marathi
अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ दिवस मानला जातो. “अक्षय” म्हणजे कधीही न संपणारे, म्हणून या दिवशी केलेले पुण्य, दान, जप आणि खरेदी यांचे फल अखंड राहते असे मानले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. सोने-चांदी खरेदी करणे, नवीन कार्याची सुरुवात करणे आणि दानधर्म करणे विशेष फलदायी मानले जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने कोणत्याही शुभ कामासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते.
Go to News Site