TV9 Marathi
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा रंगत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. विधेयकाला पाठिंबा दर्शवत असतानाच त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमोल कोल्हे म्हणाले की, महिलांसाठी धोरणात्मक निर्णय घेणारे, संरक्षण दलात संधी देणारे आणि वडिलोपार्जित संपत्तीत महिलांना हक्क देणारे नेते म्हणजे शरद पवार आहेत. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकाला आमचा मुळीच विरोध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Go to News Site