TV9 Marathi
अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा तीव्र होत असून तापमानाने 41 अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम जनजीवनावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. याचा परिणाम शिर्डी साई बाबा मंदिर परिसरातील भाविकांच्या संख्येवरही झाला असून, ती लक्षणीयरीत्या घटल्याचं दिसून येत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भाविक दर्शनासाठी येणं टाळत असल्याचं चित्र आहे.
Go to News Site