TV9 Marathi
भंडाऱ्यात वऱ्हाडींवर काळाचा घाला! लग्नाहून परतणाऱ्या मारुती व्हॅनला अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत. पवनी तालुक्यातील अड्याळ येथे ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण भंडाऱ्यात हळहळ व्यक्त होत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Go to News Site