TV9 Marathi
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अखेर सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. त्यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रासह देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. नागपूर येथे आयोजित राम कथा कार्यक्रमादरम्यान त्यांनी मंचावरून महाराष्ट्रातील जनतेची आणि शिवप्रेमींची माफी मागितली. “माझ्या वक्तव्याचा गैरसमज झाला. माझ्या शब्दांमुळे कोणाला दु:ख झालं असेल, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो,” असे ते म्हणाले.
Go to News Site