Collector
Sanjay Raut | मराठी मुद्द्यावरून राजकारण तापलं; मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर थेट हल्ला | Collector
Sanjay Raut | मराठी मुद्द्यावरून राजकारण तापलं; मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर थेट हल्ला
TV9 Marathi

Sanjay Raut | मराठी मुद्द्यावरून राजकारण तापलं; मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर थेट हल्ला

राज्यात मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्याची भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली होती. मात्र, या निर्णयाला विविध रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून विरोध झाल्यानंतर अंमलबजावणीसाठी ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत “मराठी बोलणार नाही” असे म्हणणाऱ्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Go to News Site