TV9 Marathi
पुण्यातील कोंढवा परिसरासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एका भाजप पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पदाधिकाऱ्याने कोंढव्याला “पाकिस्तान” तसेच “कराची” अशी उपमा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा वाद उफाळून आला. या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
Go to News Site