TV9 Marathi
मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील तापमानाचा पारा 35 अंशांच्या पुढे पोहोचल्याने मुंबईकरांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Go to News Site