TV9 Marathi
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून लेखी आश्वासन आणि अंमलबजावणीसाठी ठोस कालावधी जाहीर होईपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. उपोषणापूर्वी जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मारुतीरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते आंदोलनस्थळाकडे रवाना झाले असून आज सकाळी 10 वाजता ते भरउन्हात आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती मिळत आहे.
Go to News Site